"अतुल्य पिंप्रीसदो, पर्यटन समृद्ध पिंप्रीसदो"
ग्रामपंचायत पिंप्रीसदो, ता. इगतपुरी, जि. नाशिक
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
पिंप्री साद्रोद्दिन हे गाव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक निसर्गरम्य व ऐतिहासिक पर्यटन स्थळ,पावत्र्यवान दर्गा मंदिर,महारष्ट्रातील प्रसिद्ध पिढ्या पर्वताच्या अगदी पायथ्याशी वसलेले अगदी सुंदर आकर्षक,दोन पडे असलेले १)भगतवाडी २) तारांगणपाडा ३) व्यंकटेश नगर अगदी शहरालाही लाजवेल अशा वसाहती हॉटेल,जवळच ३ कि.मी. अंतरावर असलेले निसर्ग रम्य भावली धरण.गावत प्रवेश करण्याआधी प्रथम दर्शन दारणा नदीचे होते.व थोडे पुढे आल्यावर लगेच डाव्या बाजूला पुरातन काळातील शिव मंदिर पिंप्री सद्द्रोद्दिन गावाचे दर्शन घडविते.शिव मंदिराच्या डाव्या बाजूनेच तारांगण पाड्याला जाणारा रस्ता जातो.आपण सरळ वरती आलो कि,उंच वाट लागते तिलाच गावातील गावकरी दर्डी असे संबोधतात.शिव मंदिराची शिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
यात्रेस प्रमाणात भाविक दर्शनाला येतात,तसेच वरती दर्डी चढून आल्यावर अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे प्रसिद्ध असे पुरातन काळाची पीर सद्द्रोद्दिन बाबाची जागृत दर्गा आहे.या दर्गेची यात्रा (उरूस) पितृ पक्षात सप्तमी च्या दिवसापासून पुढील ३ दिवस हा उरूस चालतो.हि दर्गा खूप प्रसिद्ध जागृत असल्यामुळे नवसाला पावत असल्यामुळे भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनाला,नवस फेडण्यासाठी येतात.पहिल्या दिवशी रात्री ११.३० मिनिटांनी पीर सद्द्रोद्दिन बादशहाचा संदल असतो.संदल झाल्याच्या नंतर उरसाला सुरुवात होते.संदालच्या दिवशीच इकडे संदल चढतो व तिकडे दुध बावडी मध्ये काही काळासाठी दुध बावडीचे पाणी पांढरे होते.अशी अख्याईका आहे.या पिंप्रीसद्द्रोद्दिन गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात.परंतु संपूर्ण लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने सर्व कार्यक्रम पार पाडतात.यात्रा ( उरूस ) झाल्यानंतर तीन कुस्त्यांची विराट दंगल असते.त्यामध्ये मोठमोठी बक्षिसे वितरीत केली जातात.संपूर्ण राज्यातून विविध पैलवान या दंगलीचा आनंद घेतात.
पुढे थोडे अंतर चालून गेल्यावर समोरच मारुती मंदिर आहे.तसेच पुढे आल्यावर कमान लागते तेथेच प्रबुद्ध नगर वसलेले आहे. अगदी थोडेच अंतर चालून गेल्यावर व्यंकटेश नगर लागते.व्यंकटेश नगर अगदी शहराप्रमाणे वसलेलं आहे.व्यंकटेश नगरला लागून भगतवाडी आहे.व तसेच पुढे गेल्यावर २ कि.मी. अंतरावर भावली धरण सुंदर निसर्ग रम्य धबधब्यांनी असलेली ठिकाणे पर्यटकांना मोहित करतात.पावसाळ्यात खूपच दूर दुरून पर्यटक धबधब्याचा व धरणाचा अनाद घेण्यासाठी खूप प्रचंड गर्दीने येतात व निसर्गाचा आनंद लुटतात.
📍 पिंप्री सदो गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:
जि.प.शाळा एकूण संख्या -४
१)जि.प.शाळा पिंप्री सदो (इयत्ता १ ली ते ७ वि पर्यंत )
२) जि.प.शाळा उर्दू पिंप्री सदो (इयत्ता १ ली ते ७ वि पर्यंत )
३) जि.प.शाळा तारांगणपाडा (इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत )
४) जि.प.शाळा भगतवाडी (इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत )
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
🛠️ सुविधा
पाणीपुरवठा:
पाणीपुरवठ्यासाठी नळ योजनेची गावाला पाणी पुरेल इतकी टाकीची क्षमता असलेल्या टाक्या बांधलेल्या आहेत.
१) गावासाठी पाणी टाकी शाळा परिसरात बांधलेली आहे.
२) प्रबुद्ध नगर मध्ये १ पाणीटाकीबांधलेली आहे.
३) शुद्ध पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायत ऑफिसवर फिल्टर बसविलेले आहे. दररोज महिला हंडे, कळशा, बादल्या घेऊन फिल्टर केले पाणी घेऊन जातात. त्यांना फिल्टर पाणी नेण्यासाठी कार्ड दिलेले आहेत.
पोस्ट ऑफिस : भावली खुर्द.
बँक सुविधा:
इगतपुरी तसेच सेतू केंद्र आहेत ते बँक व्यवहार करण्यासाठी मदत करतात
ग्रामपंचायत मध्ये CSC केंद्र आहे.ते विविध योजना व सुविधा गावकऱ्याना पुरवतात.
स्वच्छता:
गावात एकूण वयक्तिक ३५० शौचालय आहेत.
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈20%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार : ~51%
- गौण कामगार : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
📲 पिंप्रीसदो ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!
ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:
फोटो गॅलरी






